Ticker

6/recent/ticker-posts

चार श्रम संहिता मागे घ्या अन्यथा देशव्यापी बेमुदत संप पुकारु -अरुण भेलके


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती / चंद्रपूर : कामगारांनी पिढ्या संघर्ष करून आपल्या न्याय हक्क मागण्यांच्या संरक्षणार्थ 29 कामगार कायदे अस्तित्वात आणले. ज्या द्वारे कामगारांना मालकासोबत वाद करणे, संप करणे, संघटना नोंदणी करणे, किमान वेतन मिळवणे, पगार वेळेवर व पूर्ण मिळवणे, बोनस मिळवणे, सामाजिक सुरक्षा अंतर्गत- पीएफ, पेन्शन, उपचार, अपघात विमा, सेवेनंतर ग्रॅच्युइटी,कामाचे तास नियंत्रित ठेवणे, व बांधकाम कामगारांचे कल्याण याची हमी होती. परंतु चार श्रमसंहितांमुळे श्रमशक्तीचं नियंत्रण व भांडवलाला मोकळ रान केल्या जात आहे.अनियंत्रित भांडवल आणि भांडवलदारांचेच अघोर हित जोपसल्यामुळे कामगार अधिक असुरक्षित होऊन पिळल्या जातील.म्हणून देशातील सर्व कामगार संघटनांच्या एकजुटीने या कामगार विरोधी श्रमसंहितांचा देशव्यापी संपाद्वारे विरोध केला आहे.या संपाची दखल सरकारने घेतली नाही, तर आम्ही देशव्यापी बेमुदत संप पुकारू असे मत CITU चे राज्य कौन्सील सदस्य कॉ. अरुण भेलके यांनी व्यक्त केले.
        ते चार श्रमसंहिता मागे घ्या! या मागणीसाठी देशातील अनेक कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समिती द्वारा पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सहभागी होत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिटू व इतर कामगार संघटनांच्या नेतृत्वात आयोजित निदर्शने आंदोलनात संबोधित करताना बोलत होते. 
      या संपात व निदर्शने आंदोलनात जिल्ह्यातील सिटू, आयटक, इंटक, बी .एच .एम .एस, गुलगुलान, जनविकास सेना, आदी कामगार संघटना व त्यांच्या जन संघटना सहभाग नोंदवत जोरदार नारेबाजी केली भारतीय शेती माती व शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा अमेरिका भारत व्यापारी करार परत घ्या! भारतावर टेरीफद्वारे दडपण आणणारे अमेरिकी साम्राज्यवाद मुर्दाबाद! जुने कामगार कायदे कायम ठेवा! चार श्रमसंहिता मागे घ्या! वीज विधेयक 2025 स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द करा! सर्व योजना कर्मचाऱ्यांना कायम करा! कट्टर पंथी भांडवलदार धारजीने धोरण बंद करा! वि भा जि राम जी मागे घेऊन पूर्वीची मनरेगा कायम ठेवा! मजुरांना प्रतिदिन सातशे रुपये मजुरी द्या! खाजगीकरण बंद करा!जिल्हा परिषदेच्या शाळा कायम ठेवा! लोहार डोंगरी खान प्रकल्प मागे घ्या! चंद्रपूर प्रदूषित करणे बंद करा! अतिक्रमित शेतमजूर व इतर मजुरांना कायम घरपट्टी देऊन घरकुल मंजूर करा! शालेय पोषण कर्मचाऱ्यांचे वर्षभरापासून थकीत मोबदला अदा करा! वीज विधेयक 2025 स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द करा!
सीटू चे महासचिव कॉ. जी. रमन्ना, सी .पी .आय. एमचे सचिव कॉ. राजेश पिंजरकर, अंगणवाडी संघटनेच्या शारदा लेनगुरे, बी. एच .एम. एस चे सैज्जूदिन शेख, एमआर युनियनचे कॉ. प्रमोद, जनविकास सेनेचे पप्पू देशमुख, उलगुलान संघटनेचे राजू झोडे, आशा संघटनेच्या सायली बावणे, शालेय पोषण संघटनेच्या प्रभा बावने, शेतमजूर युनियनचे मारुती किन्नाके, सीटीपीएस युनियनचे नागोराव शेंडे, मीटर रीडर युनियनचे करण तरारे, जनवादी महिला संघटनेच्या विद्या निब्रड, बांधकामगार युनियनचे प्रमोद गोडघाटे, आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले,कडूजी ढोके पुनालाल घरत, उषा येनूरकर, विमल गावंडे अनिल एनकर, बंडू थेटे, विठोबा एकोनकर, सीमा वनकर, वंदना बडवाईक,सुलभा पाटील, वैशाली मोडक आदींनी परिश्रम घेतले. संपात व निदर्शने आंदोलनात हजारो कामगार कर्मचऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या