चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:-पडसाळी येथे महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांच्या सुविद्य पत्नी सोनियाताई जयकुमार गोरे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माढा नगरपंचायत च्या नगराध्यक्ष मीनल ताई साठे तर प्रमुख पाहुणे म्हणून आर्यापब्लिकस्कूलच्या अध्यक्षा प्रणिताताई शिंदे, निशिगंधा कोल्हे, माया माने, अर्चना सावंत, मनीषा गिड्डे, डॉ. सुप्रिया शेळके उपस्थित होत्या.
पडसाळी येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून यंदा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. भाजपचे तालुकाध्यक्ष तथा पडसाळीचे सरपंच योगेश पाटील यांनी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमात बोलताना सोनियाताई गोरे म्हणाल्या महिलांनी शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहणे ही काळाची गरज आहे. जिजामाता, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांसारख्या महिला मुळे आपल्याला समाजात ताठ मानेने वावरता येते. तोच वारसा पुढे नेऊन आजच्या जिजाऊ होऊन आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज शिकवले पाहिजेत असे त्या म्हणाल्या.
यावेळी उपसभापती स्वाती गिड्डे, मीनलताई साठे, प्रणिताताई शिंदे, निशिगंधा माळी, सविता कोकाटे, माधुरी मोरे, ॲड. अमृता वाघे यांच्यासह पंचायत समिती सदस्य यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे महिला माता-भगिनींसाठी खेळ गप्पागोष्टी गाणी विनोद नकला उखाणे असे कार्यक्रम राबवण्यात आले. यावेळी अनेक महिलांना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळाला यावेळी अनेक महिलांनी विविध कार्यक्रम सादर केले महिला दिनाच्या निमित्ताने टीव्ही एफएम रेडिओ सिनेमा कलाकार निलेश पापत यांचा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता 155 प्रकारचे विविध आवाज काढणाऱ्या पावत्या यांनी अनेकांचे यावेळी मनोरंजन केले या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर महिलांचा प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सौ. सुरेखा फरड, डॉ. सौ. सोनल पाटील, सौ. स्वाती पाटील, सौ. रतन फरड, सौ. लता देशमुख या होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुड मॅडम, खुणे मॅडम, ढगे मॅडम, गायकवाड मॅडम, आगवणे मॅडम, अंजली पाटील, आनंदीबाई माळी, अलका मुटकुळे, जयश्री फरड, स्वाती मुटकुळे, शितल थोरात, शितल शिंदे यांनी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या