Ticker

6/recent/ticker-posts

सोनी गावात पार पडला जागतिक महिला दिन कार्यक्रम !

 विमलबाई माळी यांचा बहारदार व्याख्यानाचा कार्यक्रम 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : सांगली जिल्ह्यातील सोनी ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक महिला दिन थाटात व उत्साहात पार पडला.
या निमित्ताने विमलताई माळी यांच्या व्याख्यानाचा बहारदार एक कार्यक्रम  आयोजित करण्यात आला होता .
 स्त्रियांनी स्वतःची शैक्षणिक प्रगती करून, समाजात आदर्श निर्माण करावा. कोणत्याही कामात स्वतःला झोकून देऊन मिळालेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे  ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख  आहे, असे प्रतिपादन विमलताई माळी यांनी  केले. स्वतःच्या अनुभवावर स्वलिखित कविता व कथाकथन याचे सादरीकरण त्यांनी  या वेळी केले. ग्रामीण भाषेत कविता लेखनातून त्यांनी शेतकर्‍यांच्या जीवनावर खूप सुंदर व सुरेख कविता त्यांनी केल्या .छत्रपती शिवाजी महाराज ,धर्मवीर संभाजी महाराज यांची चरित्रे मांडली .
महिला दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने सोनी ग्रामपंचायतीच्या वतीने  गावच्या सुनबाई कवयित्री सामाजिक कार्यकर्त्या सुलोचना ताई पाटील, पहिल्या महिला पोलीस पाटील प्रज्ञाताई पाटील, लोकनियुक्त महिला सरपंच शारदाताई यादव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला 
मोठ्या संख्येंने महिला उपस्थित होत्या. 
त्यांना ग्रामपंचायती प्रशासनाच्या वतीने  भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील यांची कार्यक्रमास भेट दिली. या शिवाय ग्रामपंचायत सदस्या नंदा जाधव, छबू जाधव, शुभांगी अडगळे, उज्वला लोखंडे, वैशाली पाटील, सुजाता पाटील ,आशा वर्कर, बचत गटातील महिला, अंगणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी कुंभार , मुख्याध्यापिका आकाशी जाधव, ग्रामसेवक टी के पवार ,अशोक पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या