चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली : या अगोदर लाखनीत नागपूरच्या वाहकातर्फे साकोली येथील प्रवासाचा अपमान करण्यात आला. आता तुमसरच्या एका वाहकाने पिंडकेपारच्या एका प्रवाशाला १५ रू. चिल्लर काढा म्हणून गावाबाहेर अंधारात खाली उतरवित अपमान केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. याबाबत त्या प्रवाशाने साकोली बसस्थानकात जाऊन बस क्रमांक, वाहक नाव माहिती काढीत काल ( गुरू. १४ मे ) रोजी वाहकावर अपमान केल्याप्रकरणी कारवाई व्हावी अशी मागणी केली. तुमसर आगाराची ( मानव संसाधन विकास निळी बस ) तुमसर-साकोली बस क्र. एम.एच. ४० / ९३४२ ही एकोडी थांब्यावरून सायं. ०६:४० ला निघाली. यात पिंडकेपार येथील महेश पतिराम राजवाडे हे पिंडकेपारसाठी चढले. त्यांनी वाहकाला १०० रू. ची नोट व ४ रू. चिल्लर दिले. परंतू वाहकाने वाद घालून सुटे १५ रू. द्या नाहीतर खाली उतरा म्हणून सांगितले. तिथपर्यंत बस पिंडकेपारच्या पुढे येऊन गेली. अखेर खैरलांजी गावाजवळ अंधारात बस थांबवून त्या प्रवाशाला खाली उतरवित त्यांचा अपमान केला. चालक यांनी व बसमधील सगळ्या प्रवाशांनी सुद्धा वाहकाला म्हणाले की, जाऊ द्या खाली नका उतरवू तरी सुद्धा वाहक यांनी हिटलरशाही दाखवीत त्यांना बसच्या खाली उतरविले. नंतर प्रवासी राजवाडे पायदळ जाऊन कसे तरी पिंडकेपार येथे पोहचले. वास्तविक बघता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियमात कोणत्याही प्रवाशाला अर्ध्यावर आणि निर्जनस्थळी अंधारात बसमधून उतरविण्याचा व प्रवाशांचा अपमान करण्याचा अधिकार नाही. राजवाडे यांनी दुसऱ्या दिवशी बसस्थानक साकोली येथे जाऊन त्या बसची माहिती मागितली.अश्या काही बेबंदशाही वाहकांमुळे महाराष्ट्राच्या लालपरी कलंकित होत आहे. _______________________________________________
साकोली-पिंडकेपार बसचे तिकीट १४ रूपये असतांना १५ रूपये वाहकाने का मागितले ? माझ्याकडे ४ रूपये सुद्धा चिल्लर होते. यालाही न जुमानता वाहकाने माझ्या गावाच्या समोर गावाबाहेर अंधारात बसमधून उतरवित माझा अपमान केला. मी अंधारात पायदळ येत मला मानसिक त्रास झाला. या हेखेखोर वाहकावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
महेश राजवाडे. अपमानित प्रवासी,
पिंडकेपार


0 टिप्पण्या