हेल्पिंग हँड्स NGO व भीम आर्मीचा संयुक्त उपक्रम; सामाजिक बांधिलकीतून पीडितांना दिलासा
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे काही दिवसांपूर्वी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत अनेक घरे व गोठे जळून खाक झाले. या दुर्घटनेत अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले असून, गोठ्यात अडकून गुरे-ढोरे व शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण गावावर दुःखाचे सावट पसरले असताना भद्रावती शहरातील सामाजिक संस्थांनी माणुसकीचे दर्शन घडवत पीडितांना मदतीचा हात दिला.
पीडित कुटुंबांना आधार देण्यासाठी "हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी, भद्रावती NGO" आणि "भीम आर्मी एकता मिशन, भद्रावती" यांच्या वतीने धान्य, शैक्षणिक साहित्य, भांडी, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण समोर आले आहे.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी भीम आर्मीतर्फे महाराष्ट्र महासचिव तथा जिल्हा प्रभारी शंकर मून, जिल्हाप्रमुख जितेंद्र डोहणे, जिल्हा उपाध्यक्ष अजय गजभिये, भद्रावती तालुकाप्रमुख अतुल पाटील, अजेंद्र ढोक, स्वाती मोरे, अश्विनी पाटील, अधिरा पाटील यांनी पुढाकार घेतला.
हेल्पिंग हँड्स NGO चे मिलिंद वाघमारे, कृतांत सहारे, प्रणय वाघमारे, कनिका सिकदर, महादेव दुपारे, मायाताई कोसे, देवानंद पेटकर, ॲड. बोधिनी बोरकर, सोनल तेलंग, पंचफुला खोब्रागडे, रुपेश रामटेके, हेमंत वाघमारे, चंदन पेटकर, वंदना मून, रोशन रणवीर, किरण कवाडे, सुकेशनी रामटेके, राजेश, दीपक, भाग्यश्री थुलकर, राणी पाल, सुमेध कोठाडे, मीनल मून, तारकेश्वरी फणसे, अमोघ, सोनाली वाघमारे, प्रतीक मोबाईल शॉपी, शिल्पा, शुभम, अमिता, गुड्डू, भाऊराव, प्रशांत सातपुते, कैश शेख, सागर निरंजन, राजरत्न पेटकर, रिता सहारे, स्नेहा दारुंडे, तुषार दुर्गे, लीना उराडे, प्राची वेल्हेकर, अनिकेत बांबोडे, सुकेशनी मानकर, जया सपाटे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
समाजातील एकत्रित प्रयत्नांमुळे पीडितांना मोठा दिलासा मिळाला असून मानवतेचे उत्कृष्ट उदाहरण या निमित्ताने समोर आले आहे.
------------------- बॉक्स----------------
माणुसकी जिवंत आहे! धामणगाव अग्नितांडवातील पीडितांसाठी भद्रावतीच्या हेल्पिंग हँड्स NGO व भीम आर्मी धावली मदतीला. धान्य, कपडे, शैक्षणिक साहित्य वाटप. सर्व सहकारी कार्यकर्त्यांचे अभिनंदन.
---------------------------------


0 टिप्पण्या