चित्रा न्युज प्रतिनिधी
जालना : राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेल्या अप्पर तहसील कार्यालयांच्या यादीत सेवली गावाचा समावेश न केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १६ जून २०२६ रोजी सेवली येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, सेवली परिसरात एससी, एसटी, ओबीसी आणि मुस्लिम समाजाची लक्षणीय लोकसंख्या असूनही स्थानिक आमदार बबनराव लोणीकर यांनी सेवलीची शिफारस केल्याचा केवळ बनाव केला. सामाजिक व राजकीय द्वेषातून सेवलीला अप्पर तहसील कार्यालयाच्या यादीतून जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
आंदोलनादरम्यान शासन आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सेवलीला अप्पर तहसील कार्यालयाची मंजुरी तातडीने देण्यात यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्यासह सतीश गुमे, बबन मेहेत्रे, अतुल शेवलीकर, शरद तळेकर, अशोक तळेकर, लक्ष्मण राठोड, दिलीप बिबे, भगवान मघाडे, मुकुंद काळे, शत्रुघ्न कोळी, अनिल खाडे, दत्ता खाडे, रोशन सदावर्ते, किरण काळे, लखन सदावर्ते, शहाजी खाडे, सुनील काळे, संतोष खाडे, गौतम मगर, प्रसाद सदावर्ते, दिलीप मगर, अर्जुन घुगे, विकास सदावर्ते, सुरेश काळे, बाबासाहेब लहाने, संतोष मगर, मदन डोके, करण डोके, दीपक उघडे, आत्माराम तुरेराव, अरुण काकडे, मधुकर शेजुळ, पांडुरंग दाहीजे, किशोर खारकरी, लिंबाजी गिरी, गणेश मोरे, इंद्रजीत जोशी, मच्छिंद्र काळे, अशोक काळे, प्रकाश कायंदे, विष्णु राठोड, अमोल नांगरे, संदीप केंद्रे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.


0 टिप्पण्या