एकदिवसीय धरणे आंदोलन; 'एन्थोवेन' कालीन नोंदी ग्राह्य धरून न्याय द्या - ॲड. नकुलदादा देशमुख
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : कोळी महासंघ वाशिम यांच्या वतीने दि. 16 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एक दिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, व जिल्ह्यातील कोळी जमातीच्या इंग्रज अधिकारी R.E. ENTHOVEN कालीन कोळी नोंदी ग्राह्य धरून सर्व कोळी जमातीला न्याय द्यावा, असे विनंती पूर्वक आवाहन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचे, रिसोड-मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड. नकुलदादा देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गजानन लाटे, गोवर्धन जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम भाऊ तहकीक, अमोलभाऊ भुतेकर उपस्थित होते.
यावेळी कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष विलास रामेश्वर बेदरे, गजानन बेदरे, रामेश्वर लोखंडे, बाळकृष्ण गोडघासे, दुर्गादास बेदरे, भागवत खेकाळे, रखमाबाई वानखेडे, मंगलाबाई बेदरे, सुमित्राबाई लोखंडे, बालाबाई गोडघासे, देवानंद गोडघासे आणि इतर शेकडो समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन विलास रामेश्वर बेदरे यांनी केले.
_________________________________
कोळी समाज आक्रमक! वाशिम कलेक्टर ऑफिसवर धरणे
'एन्थोवेन' कालीन कोळी नोंदी ग्राह्य धरा, शिंदेंच्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी करा - कोळी महासंघाची मागणी. ॲड. नकुलदादा देशमुखांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शेकडो समाजबांधव सहभागी.


0 टिप्पण्या