9 जुगारी रंगेहात ताब्यात, ₹3.52 लाखांचा मुद्देमाल जप्त
नवीन भाजी मंडी परिसरात कारवाई; 5 बाईक, 8 मोबाईलही जप्त
प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती: शहरातील नवीन भाजी मंडी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रावती पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून 9 जणांना रंगेहात ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 5 मोटारसायकली, 8 मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ₹3,52,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना 14 जुलै 2026 रोजी रात्री मुखबिरामार्फत नवीन भाजी मंडी परिसरात काही जण पैशावर हार-जीतचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि छापा टाकला.
छाप्यादरम्यान जुगार खेळताना आढळलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे राजू कनोजे, सुरज सोनवणे, सोनू शेंडे, मंगेश खंडाळकर, राहुल हटकर, रवि विधाते, शुभम पचारे, योगेश शिंदे आणि अनिल निंबाळकर.
सर्वांची अंगझडती व घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
या कारवाईत रोख रक्कम व इतर साहित्य 5 मोटारसायकली, 8 मोबाईल फोन असा एकूण ₹3,52,700 मुद्देमाल जप्त करण्यात आले.
या प्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. 683/2026 अंतर्गत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
____________________________________
🎲 नवीन भाजी मंडीत जुगार अड्ड्यावर धाड!*
भद्रावती पोलिसांची मध्यरात्री कारवाई. 9 जुगारी रंगेहात. 5 बाईक, 8 मोबाईल, रोख रक्कम = 3.52 लाख मुद्देमाल जप्त. महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल. SP आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात PI योगेश्वर पारधी यांची कारवाई.


0 टिप्पण्या