———————————————————
वाढवणा पोलिसांचे क्वार्टर्स होणार जमीनदोस्त?
***********************************
सत्ताधारी लोकप्रतिनिधीची अनास्था कारणीभुत!
—————————————————————
चित्रा न्युज प्रतिनिधी
उदगीर-वाढवणा बू.(ता.उदगीर) पो.स्टे.हद्दीतील चाळीस 1 गावातील अमीर-गरीब यांच्या सुरक्षेची सर्वाधिक जबाबदारी असलेल्या वाढवणा ठाण्यातील सर्व स्टाफसाठी बांधलेल्या क्वार्टर्सची पडझड बघता कुटूंबियांसह पोलिसांची सुरक्षा 'डेंजर झोन' मध्ये आली आहे.माञ,सलग २ टर्म सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी लाभूनही याकडे त्यांनी अद्यापही लक्ष दिले नाही.हे विशेष म्हणावे लागेल..
तेंव्हा जमीनदोस्त व्हायच्या मार्गावर असलेले वाढवणचे पोलिस क्वार्टर्स जमीनदोस्त होऊन एखादी वाईट घटना घडल्यावरच संबंधित (लोकप्रतिनिधी) 'विकास पुरुष' जागे होणार का.
ठाण्याच्या हद्दीत येणा-या अमीर-गरीब जनतेला सुरक्षेची 'गॅरंटी' देणारे,कायदा व सुव्यवस्था ठीक
ठाक राहण्यासाठी २४x७ (२४ तास) डोळ्यात तेल घालून व स्वत:सह कुटूंबियांची फिकीर न करता कार्य करणा-या 'खाकीवर्दी' मधील माणसांसाठी असलेल्या क्वार्टर्स (वसाहत) च्या नुतनीकरणाकडे कुणाचेही लक्ष नसावे,म्हणजे यापैक्षा दुदैवं ते दुसरे काय..
निजामकाळात पोलिस ठाण्याची इमारत बांधली तशी येथे पोलिस वसाहतही बांधल्याची चर्चा आहे.माञ,ठाण्याच्या इमारतीची अधून-मधून डागडूजी केली पण वसाहतीची केली नाही.तेंव्हा वसाहतीकडे दुर्लक्ष का?करण्यात आले.हे एक आजवर कुणालाही न उलगडलेले कोडेच आहे!
लातुर जिल्ह्यात जेथे,कुठे नव्याने ठाणे झाले तेथे आधुनिक सोयीसुविधांनीयुक्त पोलिस ठाण्यासह वसाहत म्हणजे क्वार्टर्स बांधल्याचे दिसते.
माञ,निजामकाळापासून अस्तित्वात असलेले वाढवणा बू.येथील पोलिस ठाण्याच्या इमारतीसह क्वार्टर्स हे कधी पण जमीनदोस्त होण्याच्या वाटेवर असल्याचे पोलिस व जनतेला दिसते.पण 'विकास पुरुष' म्हणवुन घेणा-या सत्तापक्षातील विद्यमान लोकप्रतिनिधीला आजवर दिसले नाही का?व दिसणार कधी?असे प्रश्न ठाण्याच्या हद्दीत चर्चीले जातात.


0 टिप्पण्या