चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:-भंडारा जिल्हाच नव्हे तर विदर्भाच्या बाहेर नावाजलेले सुप्रसिद्ध प्रबोधनकार, कलावंत मनोज कोटांगले. १ ऑगस्ट २०२६ हा मनोज कोटांगले यांचा प्रथम स्मृती दिन. या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य साधून एकोडी येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सुमेध बुद्ध विहार येथे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पूर्वी सकाळी ९ वाजता सुप्रसिद्ध आलेबेदर या पवित्र ठिकाणी वृक्ष पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर अनुक्रमे एकोडी परिसरात वृक्ष पूजन, भिक्खू संघ भोजनदान, परित्रान, दुपारी संगीतमय कार्यक्रम, बुद्ध वंदना आणि गुरु-शिष्य सत्कार सोहळा या कार्यक्रमांचा समावेश आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहान त्यांच्या मित्र परिवाराने केलेले आहे.


0 टिप्पण्या