Ticker

6/recent/ticker-posts

कारगिल विजय दिवस


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-  शामराव बापू कापगते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने भारतीय सैन्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एस. एस. शहारे यांना शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून जी. आर. दहापुते गट निदेशक यांनी कारगिल विजय दिवस आणि आय.टी. आय. प्रशिक्षणार्थी यांच्याकरिता भारतीय सैन्यात असलेल्या संधी विषयावर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद सोनवणे प्रमुख पाहूणे म्हणून राजेश वाडकर, तुमसरे उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सुनील रायकवार यांनी केले. 
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता बोरकर ,रामटेके , सोळंकी, कापगते कु. अतकरी कु. भांडारकर यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या