Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श मुख्याध्यापक चिल्लम पांडे सरांचा सेवा गौरव सोहळा उत्साहात संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 

हंडरगुळी : सौ. रुक्मिणी माता माध्यमिक कन्या विद्यालय, हंडरगुळी येथील आदर्श मुख्याध्यापक आदरणीय चिल्लम पांडे सर यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय शैक्षणिक सेवेला गौरविण्यासाठी संस्थेच्या वतीने भव्य सेवा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक आदरणीय नारायणरावजी वाघमारे साहेब तसेच संस्थेच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चिल्लम पांडे सरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

चिल्लम पांडे सरांनी तब्बल ३३ वर्षे या विद्यालयात अविरत सेवा बजावत हजारो विद्यार्थिनींच्या शैक्षणिक, बौद्धिक व नैतिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थिनी विविध क्षेत्रांत यशस्वी होत समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करू शकल्या आहेत.

कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी चिल्लम पांडे सरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यास उत्तम आरोग्य, आनंद, दीर्घायुष्य व भरभराटीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम भावनिक वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी सरांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या