Ticker

6/recent/ticker-posts

एक तरी झाड लावा आणि त्याचा आनंद घ्या- किरण पुरंदरे


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-निसर्ग प्रेमी, पक्षीतज्ञ किरण पुरंदरे यांनी नुकतेच एक आवाहन  नागरिकांना केलेले आहे. एक तरी झाड लावा आणि त्याचा आनंद घ्या असा एक सर्वांना आवाहन करणारा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेला आहे. किरण पुरंदरे हे अनेक वर्षापासून साकोली तालुक्यातील पिटेझरी येथे आदीवासी भागात वास्तव्यास आहेत.
नागझिरा अभयारण्य तथा व्याघ्र प्रकल्पा लागत हे गाव असून त्यांचे या गावातील महिला, पुरुष, विद्यार्थी याकरिता अनेक उपक्रम राबविणे सुरू आहे. नुकतेच त्यांनी आपल्या रोपवाटिके मार्फत फळांच्या झाडाचे निशुल्क वितरण नागरिकांना केलेले आहे. प्रत्येकानी फळांची झाडे लावावी. त्या निमित्ताने ही विविध प्रकारची फळे मुलांना चाखायला मिळतील. झाडाला फळे लागली असल्याने पशुपक्षी वास्तव्यात येतील. त्या निमित्ताने एक प्रकारे पर्यावरणात भर पडेल. प्रत्येकाने एक झाड लावले तर पर्यावरण वाढविण्यास सर्वांचे सहकार्य लाभेल. त्यांनी नुकताच एक व्हिडिओ जारी केलेला आहे. त्यात किरण पुरंदरे आणि त्यांच्या पत्नी अनघा आहेत. या दाम्पत्यांनी जारी केलेल्या व्हिडिओत किरण पुरंदरे म्हणतात की, प्रत्येकाने एक झाड लावावा आणि वाढवावा. ते काय जादू करते ते बघा. १४५  कोटी भारतीयांना माझेआवाहन आहे की, एकच झाड लावा आणि त्यांचा आनंद घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या