भाजपचे विजय वानखेडे यांची आमदार करण देवतळेंकडे मागणी
राजेश येसेकर चित्रा न्युज
चंद्रपूर :भद्रावती तालुक्यातील सुमठाणा-तेलवासा ईंजिमा क्र. 23 या रस्त्याचा 'अमृत रस्ते विकास योजना 2025-2027' अंतर्गत प्रमुख जिल्हा मार्गात दर्जोन्नती करून समावेश करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
भाजपचे ग्रामीण महामंत्री तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय रामदास वानखेडे यांनी वरोरा-भद्रावती मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांना याबतचे निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या हा रस्ता इतर जिल्हा मार्ग ईंजिमा क्र. 23 आहे. त्याला राज्यमार्गात दर्जोन्नती देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला आहे. तसेच जिल्हा परिषद चंद्रपूरच्या सर्वसाधारण सभेनेही या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
इतर जिल्हा व ग्रामीण मार्गांचा थेट राज्यमार्गात समावेश झाल्याने हा रस्ता 'अमृत रस्ते' योजनेत समाविष्ट होऊ शकलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय मुंबई येथून तातडीने मंजुरी मिळवून या मार्गाचा 2025-2027 योजनेत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मार्गाच्या विकासामुळे सुमठाणा, तेलवासा व परिसरातील गावांतील नागरिक, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित, जलद आणि सुकर वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे आमदारांनी सकारात्मक पाठपुरावा करून लवकर मंजुरी मिळवून द्यावी, अशी विनंती वानखेडे यांनी केली आहे.
------------------------------------------------------
🛣️ सुमठाणा-तेलवासा रस्त्यासाठी आमदारांकडे मागणी!
भाजपचे विजय वानखेडे यांनी आमदार करण देवतळेंकडे निवेदन. इंजिमा क्र. 23 ला 'अमृत रस्ते योजना 2025-2027' मध्ये समावेश करावा. जिल्हा परिषदेने मंजुरी दिली. रस्ता राज्यमार्गाचा दर्जा मिळाल्यास शेतकरी-विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. लवकर मंजुरीची मागणी


0 टिप्पण्या