Ticker

6/recent/ticker-posts

टिळक विद्यालय खंडाळा येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :- टिळक विद्यालय खंडाळा येथे गुरुपौर्णिमेचा सोहळा अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. विद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सत्कारमूर्ती सेवानिवृत्त शिक्षक पर्वते सर यांनी भूषवले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्यंकटजी उत्तमवार, उपाध्यक्ष भारतजी कांबळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एन. निर्वाण सर, तसेच डी. डी. तुमसरे, ए. आर. कुंभरे सर आणि एम. व्ही. मेश्राम मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
       गुरुपौर्णिमा दिनाचे औचित्य साधून, विद्यालयाच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक पर्वते सर यांचा शाल, श्रीफळ व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोपट्याच्या रूपाने दिलेला हा सन्मान उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
         याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुस्थानी असलेल्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करत आकर्षक भाषणे व सुंदर गीते सादर केली. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी आणि शिक्षकांनी आपल्या मनोगतातून गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले आणि विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी राजश्री कांबळे व दिव्या पुस्तोडे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन एम. व्ही. मेश्राम मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी माता सरस्वतीच्या आरतीने आणि उपस्थित सर्वांना प्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता झाली. या खास दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार व गोड पदार्थांची (स्वीट) सुंदर व्यवस्था करण्यात आली होती, ज्याचा विद्यार्थ्यांनी मनमोहक आनंद घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या