चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :-आषाढी एकादशीचे औचित्य साधून अतुल इंग्लिश कॉन्व्हेंट येथे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पंचशील वार्ड येथील अतुल इंग्लिश कॉन्व्हेंट मध्ये सदर कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष बी. व्ही. शहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडतात. या प्रसंगी शाळेच्या प्राचार्य माधुरी कळमकर, शिक्षिका वृंद मेघा डोंगरवार, आरती उपाशे, उज्वला साखरे, ऋस्वामिनी कराडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शाळा परिसरात अनेक ठिकाणी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी वृक्षांची लागवड केली.


0 टिप्पण्या