Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी पंचायत समितीच्या सभापतींविरोधात 11 सदस्यांचा अविश्वास प्रस्ताव दाखल

पारदर्शकता, निधी वितरणावरून नाराजी आरोप

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी(श.प्र.):- पंचायत समितीच्या सभापती सौ. अश्विनी रूपवसंत मोहतुरे (कान्हेकर) यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन पंचायत समितीच्या 11 सदस्यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 च्या कलम 67 अन्वये हा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी, भंडारा यांच्याकडे गटविकास अधिकारी पंचायत समिती लाखनी यांच्यामार्फत सादर करण्यात आला आहे.यात अविस्वास प्रस्तावावर 12 सदस्य संख्या असलेल्या पंचायत समिती लाखनी येथील 11 सदस्यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे अधिनियमातील आवश्यक संख्येपेक्षा जास्त पाठिंबा प्रस्तावाला आहे.सदस्यांच्या स्वाक्षरी  केल्या आहेत त्यात उपसभापती श्री. सुनिल बांते, श्री. गिरीश बावनकुळे, श्री. विकास वासनिक, श्री. रविंद्र खोब्रागडे, श्री. सुरेश झंझाळ, श्री. किशोर मडावी, सौ. सविता राघोर्ते, सौ. मनिषा हलमारे, सौ. योगिता झलके, सौ. शारदा मते, सौ. प्रणाली सार्वे.यांनी स्वाक्षरी केल्या असून सदस्यांनी दिलेल्या प्रस्तावात सभापतींवर खालील गंभीर आरोप केले आहेत त्यामध्ये पंचायत समितीच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव,सदस्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेणे,विकासकामांच्या नियोजन व अंमलबजावणीत हलगर्जीपणा,शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकडे दुर्लक्ष,निधीचे योग्य नियोजन व न्याय्य वितरण न करणे,पंचायत समितीच्या सदस्यांना समान वागणूक न देणे,जनहिताच्या प्रश्नांबाबत अपेक्षित कार्यवाही न करणे हे आरोप असल्याने प्रस्तावात कलम 67 अन्वये नियमांनुसार विशेष सभा बोलावून अविश्वास प्रस्तावावर आवश्यक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सदस्यांनी केली आहे.अविश्वास प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत विशेष सभा बोलावणे बंधनकारक आहे.12 पैकी 11 सदस्य एकत्र आल्याने लाखनी पंचायत समितीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर विशेष सभेची तारीख निश्चित होणार आहे.सभेत उपस्थित सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने प्रस्ताव पास झाल्यास सभापती पद रिक्त होईल त्यामुळे राजकारण काहीही होऊ शकते म्हणून विद्यमान सभापती कोणते राजकिय आश्रय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या