चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली : देशभरातील पत्रकारांना एकाच व्यासपीठावर आणणारे आणि पत्रकारितेच्या वर्तमान व भविष्यातील दिशेचा वेध घेणारे आंतरराष्ट्रीय 'व्हॉईस ऑफ मीडिया' च्या महाराष्ट्र राज्य कमेटीवर साकोलीचे पत्रकार आशिष चेडगे यांची प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली. याबद्दल तालुका पत्रकार संघ साकोली व व्हॉईस ऑफ मीडिया वतीने त्यांचे अभिनंदन केले आहे. नवी दिल्ली येथे २९ जुलैला जंतरमंतर वर झालेल्या पत्रकारांच्या आंदोलनात साकोली वरून आशिष चेडगे यांनी तेथे कॅमेरासह विशेष प्रसारण करीत दिल्लीतील संपूर्ण सोशल मिडीयातून छायाचित्रे एडिटिंग करीत आपला प्रसिद्धीचा ठसा प्रधानमंत्री कार्यालय पर्यंत उमटविला. या कर्तव्यदक्ष कार्याची दखल घेऊन व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र विभागीय प्रदेशाध्यक्ष नरेंद्र देशमुख यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के व राज्य अध्यक्ष विजय चोरडिया यांकडे आशिष चेडगे यांचे नाव प्रवक्ते पदाकरीता सुचविले. व ही निवड थेट मुंबईहून ०४ ऑगस्टला करण्यात आली. आशिष चेडगे यांच्या नियुक्तीमुळे भंडारा जिल्ह्यातील साकोली शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून शहराला महाराष्ट्र स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल साकोली तालुका पत्रकार संघ, व्हॉईस ऑफ मीडिया भंडारा जिल्हा व साकोलीतील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


0 टिप्पण्या