Ticker

6/recent/ticker-posts

नागझिरा व्याघ्र प्रकल्प अभयारण्य रस्त्यावरील खड्डा जीवघेणा


खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा

रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 

साकोली: सध्या पावसाळा सुरू आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. असाच प्रकार सध्या नागझिरा अभयारण्य रोडवर दिसून येत आहे. सध्या या रस्त्यावर पडलेले खड्डे विद्यार्थी आणि पालकांसाठी जीवघेणे ठरू लागलेले आहेत. अनेक दिवसापासून हे खड्डे जीवघेणे ठरत असतांना याकडे शासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. नागझिरा व्याघ्र प्रकल्प अभयारण्य हा साकोलीतील सर्वाधिक रहदारीचा रस्ता आहे. जमनापूर, वडेगाव, खांबा, जांभळी, तुडमापुरी ही मुख्य गावे साकोलीतील प्रमुख रस्त्याशी जोडलेली आहेत. सदर गावातील नागरिक या मुख्य रस्त्याने तालुक्याच्या ठिकाणी विविध कामांसाठी रोज येत असतात. विशेष म्हणजे या रस्त्यावर व्यावसायिक दुकानांसह शाळा, महाविद्यालय परिसर आहे. या रस्त्यावरून रोज ३,००० च्या जवळपास विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेली आहेत. या खड्ड्यातून सर्वांना आपली वाहने काढावी लागतात. खड्ड्यात पाणी भरल्यावर खड्डा दिसून येत नाही. त्यामुळे वाहने खड्ड्यात आदळतात. सध्या या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात होत आहे. या खड्ड्याची लवकरात लवकर दुरूस्ती न केल्यास मोठ्या अपघाती शक्यता आहे. हा खड्डा केव्हाही कुणाच्याही जीवावर उठू शकतो. त्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी म्हणण्याची वेळ या परिसरातील नागरिकांवर आलेली आहे. 

----------------------------------------------
शहराच्या ठिकाणी जे काही मुख्य रस्ते आहेत त्यात नागझिरा अभयारण्य रस्ता हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. सध्या अभयारण्याचे पर्यटन बंद असले तरी शाळा महाविद्यालय सत्र सुरू झालेले आहे. शेकडो नागरिकांसह हजारो विद्यार्थी या रस्त्यांवरून ये जा करतात. हा रस्ता शाळा महाविद्यालय परिसर आहे. दरवर्षी या रस्त्यावर खड्डे पडतात. हा प्रश्न नेहमी करिता मार्गी लावायला हवा. पावसाळा सुरू आहे. या खड्ड्यात पाणी साचत असल्यामुळे रात्रीच्या वेळी खड्डा दिसत नाही. या रस्त्यावरील खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे प्रशाससाने त्वरित लक्ष द्यावे.

कुणाल तिडके. 
कुणाल टी सेंटर, नागझिरा रोड साकोली. 

---------------------------------------------

या रस्त्यांवर नेहमीच वर्दळ असते. सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत या रस्त्यावरून वाहतूक सुरू असते. मात्र या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालकाच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. या खड्ड्यांमुळे शारीरिक व्याधीला समोर जावे लागत आहे. संपूर्ण रस्ता खड्ड्याने व्यापल्याने या खड्ड्यातून वाहन काढल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कुणाची जीवित हानी होण्यापूर्वी या खड्ड्यांचा बंदोबस्त करावा. 

लीलाधर पटले.
सामाजिक कार्यकर्ता, जमनापूर .
----------------------------------------------
मला या रस्त्याने रोज जाणे येणे करावे लागते. या रस्त्यावर खड्डा पडणे हे नित्याची बाब झालेली आहे. या रस्त्यावरून नागरिकांसह मालवाहतूक वाहने अधिक प्रमाणात चालत असतात. हा रस्ता दरवर्षीत उखडत असतो. मात्र पावसाळ्यात याचा त्रास अधिक असतो. खड्ड्यात पाणी भरले की जाणाऱ्या येणाऱ्यांना खड्डा दिसत नाही. त्यात वाहने आदळतात. त्यामुळे शारीरिक इजा आणि  वाहनाचे  छोटे-मोठे नुकसान होत असते. या रस्त्याची वेळेवर दुरुस्ती न केल्यास हा रस्ता कुणासाठी यमराज ठरु शकतो. 

ताराचंद क्षीरसागर.
फॅशन शूज सेंटर साकोली.
निवासी जमनापूर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या