चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त ११ ऑक्टोंबर २०२५ रोजी ' या भारतात बंधुभाव नित्य वसु दे ' या विद्यापीठ गीताच्या सामूहिक गायनाचा ऐतिहासिक उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या भव्य उपक्रमातून विद्यापीठाने गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसह चार जागतिक विक्रमांची नोंद करून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात एक नवा इतिहास निर्माण केला. या ऐतिहासिक उपक्रमासाठी ५२ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ हजारापेक्षा अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित होते तर १५ हजाराहून अधिक विद्यार्थी ऑनलाईन माध्यमद्वारे या उपक्रमाशी जोडले गेले होते. या सामूहिक गायनाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया या चार प्रतिष्ठित जागतिक विक्रम संस्थांमध्ये करण्यात आलेली होती.
या विश्वविक्रमाच्या यशामध्ये भंडारा जिल्ह्यातील महाविद्यालयांमधून या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद देऊन महाविद्यालयाने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठतर्फे वैनगंगा बहुद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित, बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय साकोलीला विशेष पारितोषिक जाहीर करण्यात आलेला होता. नुकतेच सदर पुरस्काराचे वितरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील सभागृह पुरस्कार करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स विद्यापीठ कुलगुरू डॉ. नितीन पाटील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, प्र. कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, डॉ. रवलीनसिंग खुराना आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आतिश शहारे यांनी महाविद्यालयाच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कार वितरण प्रसंगी महाविद्यालयाचे सहकारी प्रा. आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख संतोष गोटेफोडे, रजनीश गौतम प्रामुख्याने उपस्थित होते.
महाविद्यालयाने सदर विशेष पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचे संस्था संस्थापक डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, संस्था सचिव डॉ. वृंदाताई करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, डॉ. लोकानंद नवखरे यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केलेले आहे.


0 टिप्पण्या