चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली: महाराष्ट्रात प्रबोधनाची चळवळ सांगणारे अभ्यासू व्यक्तिमत्व स्मृतिशेष प्रबोधनकार मनोज कोटांगले यांचा प्रथम स्मृती दिवस व गुरुशिष्य स्नेहमीलन सोहळा सुमेध बुद्ध विहार एकोडी येथे पार पडला. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध आलेबेदर येथे वृक्ष पूजन, एकोडी येथील वृक्ष पूजन, भिक्खू संघ भोजनदान, परित्राण, संगीतमय कार्यक्रम, श्रद्धांजली कार्यक्रम, गुरुशिष्य सत्कार सोहळा या कार्यक्रमाचा समावेश होता. गुरुशिष्य मिलन सोहळा हा कार्यक्रम राष्ट्रीय प्रबोधनकार प्रकशनाथ पाटणकर, अनिरुद्ध शेवाळे, मनोजराजा गोसावी, सुरेश मानवटकर हिंगणा अध्यक्ष ऍड. रामटेके भंडारा, प्राचार्य अभय बन्सोड, सुभाष मानवटकर, कार्तिक तिरपुडे, प्रा. राहुल तागडे, अविनाश शेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडला. संगीतमय कार्यक्रमात महाराष्ट्र नावाजलेले गायक प्रबोधनकार विकास राजा, सुभास कोठारे, सुशील सद्धर्मी, कलाकार खोब्रागडे संदेश राऊत, संगीता गोंडाने, राणी तबस्सुम इतर प्रबोधनकार यानी श्रद्धांजली गुरुशिष्य या विषयावर गीत सादर केले. त्यामध्ये वादक म्हणून राकेश वालदे, दिलीप कोटांगले, सोनू मेश्राम, अभिषेक रामटेके, लक्ष्मीकांत बोरकर, प्रयाग बोरकर, भारत पिल्लेवान, आशिष देशभ्रतार, गुड्डू राऊत,अनुप बोरकर यांनी साथ दिली. या कार्यक्रमाचे आयोजन मोहिनी मनोज कोटांगले, एकनाथ कोटांगले, मंगेश कोटांगले, भावेश कोटांगले, संदिप कोटांगले, तेजस कोटांगले, फुलन कोटांगले, निशा कोटांगले, शालू कोटांगले, तेजस्विनी कोटांगले , तनवी कोटांगले, सिद्धांत,संकल्प आरुष तक्षील,कोटांगले आयोजन केलेले होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी फिरोज कोटांगले, कैलास जांभुळकर,सुखराम जांभूळकर, प्रशांत कोटांगले, टीकाराम द्रगकर,राधेश्याम नेवारे, तोशांत भास्कर, तिर्थानंद बोरकर, रुपेश कोटांगले, कार्तिक मेश्राम, सुसेन्द्र मेश्राम साहिल उके, स्वप्नील बडोले, पंकज सोनवाणे,कुणाल मेश्राम यांनी सहकार्य केले


0 टिप्पण्या