चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:स्मृतिशेष प्रबोधनकार मनोज कोटांगले यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ जनजागर कला साहित्य संघटना व नवनिकेतन नाट्य कला संच यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. हाय. व कनिष्ठ महाविद्यालय एकोडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून पात्र ठरलेल्या शेजल कार्तिक मेश्राम हिचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील तिच्या उल्लेखनीय यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय एकोडी प्राचार्य विलास लांजेवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जनजागर कला, साहित्य संघटनेचे अध्यक्ष प्रबोधनकार भावेश कोटांगले, नवनिकेतन नाट्य कला संचाचे उपाध्यक्ष कार्तिक मेश्राम, सहसचिव कमलाकर चांदेवार, नाट्य कलावंत टीकाराम दृगकर उपस्थित होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धेची प्रेरणा निर्माण होऊन अधिकाधिक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे वळतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे नियोजन जनजागर प्रबोधनकार कला संघटना व नवनिकेतन नाट्य कला संच यांच्या वतीने करण्यात आले होते.


0 टिप्पण्या