मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी
चंद्रपूर प्रतिनिधी : राजेश येसेकर
चंद्रपूर : भद्रावती शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठ, बसस्थानक परिसर तसेच निवासी भागात मोठ्या प्रमाणात मोकाट गायी, बैल व इतर जनावरे दिवसरात्र फिरत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.या आशेयाचे निवेदन कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव यांच्या नेतृत्वात
विजयकुमार जांभूळकर उप मुख्याधिकारी नगर परिषद भद्रावती यांना देण्यात आले.
अनेकदा या जनावरांमुळे अपघात होऊन वाहनचालक व पादचारी जखमी होत आहेत. तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे.
भद्रावती वगळता इतर शहरात वाहतूक पोलीस व संबंधित विभागांनी संयुक्त कारवाई करून रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांविरुद्ध पशू क्रूरता प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम व इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्याच धर्तीवर भद्रावती शहरातही प्रभावी मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.त्याअनुषंगाने आपणास निवेदना द्वारे करण्यात येते की, भद्रावती शहरातील मोकाट जनावरांची तात्काळ पकड मोहीम राबविण्यात यावी, रस्त्यावर जनावरे मोकाट सोडणाऱ्या मालकांची ओळख पटवून त्यांच्यावर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने संयुक्त पथक तयार करून नियमित कारवाई करावी, वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मालकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ व शाळांच्या परिसरात विशेष मोहीम राबविण्यात यावी. भद्रावती शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सुरळीत वाहतुकीसाठी या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी
या निवेदनाच्या प्रति
जिल्हाधिकारी चंद्रपूर - पोलीस अधीक्षक चंद्रपूर - तहसीलदार भद्रावती - ठाणेदार भद्रावती यांना देण्यात आले.
निवेदन देते वेळी कॉम्रेड अरविंद कुमार कॅप्टन - कॉम्रेड रवींद्र गैनवार - कॉम्रेड सुनिल रामटेके - कॉम्रेड रवींद्र तराळे इत्यादी पदाधिकारी हजर होते


0 टिप्पण्या