नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अरविंद चव्हाण यांची पाहणी
प्रतिनिधी ✍️ राजेश येसेकर
चंद्रपूर : जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील
नगर पंचायत जिवती येथील वार्ड क्रमांक ११ मधील नागरिकांच्या विविध समस्यांची पाहणी करण्यासाठी शिवसेना तालुका संपर्क प्रमुख तथा जिल्हा सोशल मीडिया राजुरा-ब्रह्मपुरी क्षेत्र समन्वयक अरविंद चव्हाण यांनी नागरिकांसोबत प्रत्यक्ष वार्डाची पाहणी केली.व तेथील समस्या जाणून घेतल्या.
वार्डातील नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडत अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याची व्यथा व्यक्त केली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नाली साफसफाईचा अभाव, पिण्याच्या पाण्याची समस्या, निवासासाठी घरांची आवश्यकता तसेच इतर आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांनी पुढे असा आरोप केला कि, मागील पाच वर्षांच्या कालावधीत वार्डातील विकासकामांकडे पुरेसे लक्ष देण्यात आले नाही. नगरसेविका तयामबी रसूल शेख यांच्या कार्यकाळात वार्डात अपेक्षित विकासकामे व मूलभूत सुविधांची पूर्तता झाली नसल्याची नाराजी नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.
नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत अरविंद चव्हाण यांनी वार्डातील परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नाली साफसफाई, पिण्याचे पाणी, घरकुल तसेच आवश्यक नागरी सुविधांबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नागरिकांच्या समस्या शासन-प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन त्या मुलभुत समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याची भूमिका अरविंद चव्हाण यांनी यावेळी प्रामुख्याने घेतली आहे.


0 टिप्पण्या