चित्रा न्युज प्रतिनिधी
लातुर :-वाढवणा पो.स्टे.हद्दीत असलेल्या डोंगरशेळकी बीटचे अंमलदार संजय कलकत्ते यांची पोलिस हेड काॅन्सटेबल तथा जमादार म्हणुन बढती/पदोन्नती झाली म्हणुन सपोनि.सुनील गायकवाड यांनी त्यांचा सन्मान केला.यावेळी संजय दळवे, शिवाजी केंद्रे,इकराम उजेडे,मधूकर कार्लेवाड यांच्यासह महीला व पुरुष पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
संजय कलकत्ते यांनी "खाकी वर्दी" ची "शान" राखत अंत्यंत प्रामाणिकपणे आजवर कार्य केले. त्या कार्याची दखल वरिष्ठांनी घेतली आणि पोलिस हेड काॅन्सटेबल म्हणुन बढती केली. म्हणुन उपविभाग पोलिस अधिकारी अरवींदजी रायबोले,सपोनि.सुनीलजी गायकवाड,पोउपनी. प्रवीणजी हालसे साहेबांसह जेष्ठ पञकार पप्पू पाटील,पोलिस मिञ अतूल बिरादार,सहकारी पोलिस बांधव सर्वश्री तुकाराम बळदे,बालाजी अक्केमोड,गोरख कसबे,सोनू सोनकांबळे आदींनी कलकत्तेंचे अभिनंदन केले.


0 टिप्पण्या