Ticker

6/recent/ticker-posts

मोर्शी शहरांमध्ये राष्ट्रीय हत्तीरोग दिन साजरा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :-उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय हत्तीरोग दिवस साजरा करण्यात आला हत्तीरोग आजाराचा प्रसार मायक्रोफायलेरिया या कृमीमुळे होतो मायक्रोफायलेरियाची कृमी क्युलेक्स डासापासून मनुष्याच्या शरीरात प्रवेश करते क्युलेक्स डासाची उत्पत्ती घाण पाण्यात होते त्यामुळे घाण पाण्याची साठवणूक घराभवती होऊ न देण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येते. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच परिसर स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे यावर उपाययोजना म्हणून घरातील वापरात असलेल्या पाणी साठविण्याचे माठ टाके इत्यादी तसेच घरगुती सांडपाण्याची योग्य विल्हेवाट संडास गॅस पाईपला जाडी बसविणे डास उत्पत्ती स्त्रोत नष्ट करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. 
             राष्ट्रीय हत्तीरोग दिनाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोतदार तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर शरद जोगी जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉक्टर जुनेद यांचे मार्गदर्शनाखाली हत्तीरोग दिनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. 
           यावेळी श्रीराम नर्सिंग कॉलेज मोर्शी येथे येथील विद्यार्थिनींच्या मार्फत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले तसेच शहरांमध्ये हत्तिरोग जनजागृती करण्यात आली यावेळी रुग्णालयाचे कर्मचारी विनय शेलुरे, प्रकाश मंगळे, प्रशांत बेहरे, संघपाल कांबळे, नंदू थोरात, ऋषी दहेकर, अक्षय शेवाळे, विनोद डहाके तसेच श्रीराम नर्सिंग कॉलेजचे मुख्याध्यापक राहुल ढवळ व सर्व शिक्षक वृंद हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या