Ticker

6/recent/ticker-posts

प्रणय डोंगरेचे सुयश


चित्रा न्युज प्रतिनिधी 

साकोली :-प्रणय निलकंठ डोंगरे याने राष्ट्रीय ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. प्रणय डोंगरे हा वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित, बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी साकोली येथील बी. फार्म. चतुर्थ वर्गातील विद्यार्थी आहे. सदर स्पर्धा वसंतादेवी पाटील इंडस्ट्रीज ऑफ फार्मसी कोडोल, जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली होती. सदर स्पर्धेत प्रणय याने यश संपादन केल्याचे श्रेय बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आतिश शहारे, क्रीडा तथा राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. संतोष गोटेफोडे, संपूर्ण प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांना दिलेले आहे. या स्पर्धेत प्रणय याने यश मिळविल्याने संस्था संस्थापक डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, संस्था सचिव डॉ. वृंदाताई करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, नवजीवन विद्यालय तथा ज्युनिअर सायन्स कॉलेजचे मुख्याध्यापक डॉ. लोकानंद नवखरे यांनी अभिनंदन केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या