Ticker

6/recent/ticker-posts

मराठी पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हा संघटक पदी परमेश्वर गोपतवाड सवनेकर यांची निवड..

लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड                       
नांदेड :-जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या कार्यकारणी  मध्ये  मराठी पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार अनिल कसबे तर हिमायतनगर येथील दैनिक देशोन्नती तालुका प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांच्यावर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या ग्रामीण जिल्हा संघटक पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने जिल्हा अध्यक्ष संतोष पांडागळे यांनी जाहीर केले .या निवडीबद्दल हिमायतनगर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे ही कार्यकारणी मराठी पत्रकार संघाचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे अध्यक्ष मिलिंदअष्टिवकर कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस सुरेश नाईक कवाडे कोषाध्यक्ष मन्सूर भाई शेख उपाध्यक्ष प्रकाश कांबळे डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे विभागीय सचिव  आधी स्वीकृत समितीचे विभागीय अध्यक्ष विजय जोशी माजी सरचिटणीस तथा दैनिक एकमेकचे आवृत्ती प्रमुख चारुदत्त चौधरी माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदीप नागापूरकर गोवर्धन बियाणी व जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे .या नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणी मध्ये हिमायतनगर येथील दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड सवनेकर यांची ग्रामीण जिल्हा संघटक पदी नियुक्ती करून त्यांच्यावर जिल्ह्यातील पत्रकाराचे प्रश्न सोडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी टाकून पत्रकाराचे संघटन आगामी काळात अधिक मजबूत करण्यासाठी काम करा असे सांगून जिल्हा अध्यक्ष संतोष पांडागळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शेख रफिक भाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्धन ताडेवाढ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्तराम पाटील करंजीकर सह पत्रकार माधव पाटील करंजीकर हिमायतनगर तालुका मराठी पत्रकार संघाकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या