चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-२०२५|२०२६ या नवीन शैक्षणिक सञाला दि.१६ जून पासून सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा परिसर गजबजुन गेला होता.
तीन सरकारी व सात खाजगी शिक्षण संकूल हाळी-हंडरगुळी येथे आहेत.वडगाव,मोरतळवाडी,शेळगाव,आनंदवाडी,बोरगाव,रुद्रवाडी, खरबवाडी,नागदरवाडी,चिद्रेवाडी, राचन्नावाडी,वंजरवाडी येथून शाळा व काॅलेजसाठी हजारो विद्यार्थी स्कूल चले हम असे म्हणत उत्सहात शाळा,काॅलेज मध्ये आले होते..
बैलगाडीतून मिरवणूक
जि.प.शाळा हाळी येथील १ली,७वी मधील चिमुकल्यांची वाजतगाजत बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली होती.नंतर शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी शिक्षक,शिक्षिका व ग्रामस्थं उपस्थित होते.
0 टिप्पण्या