Ticker

6/recent/ticker-posts

७ वर्षापासून रखडलेल्या उदगीरच्या बसस्थानक बांधकामाची आजी-माजी आमदारांनी केली पाहणी!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-प्रवाशांच्या सोयीसुविधांचे कोण,कोणती साधने आहेत?कोणती नाहीत?तसेच प्रवासादरम्यान येणा-या अडीअडचणींची तक्रार करण्यासाठी संबंधित अधिका-यांचे फोन नंबर चालकाच्या पाठीमागच्या जागेत फीड केलेत का?खटारा बसेस किती व त्या रोडवर का सोडतात?तसेच वाढवणा व वायगाव पाटीवरचे आणि हंडरगुळी येथील प्रवाशी निवारा शेड कुठे व कुणी गायब केले?बसस्थानकाचे काम टक्केवारीमुळे रखडले का अन्य कारणांमुळे?याचा जाब विचारायची "डेअरींग" न केलेल्या आजी व माजी आमदारद्वयांनी नुकतेच उदगीर आगारास भेट देऊन नवीन बसेसचे लोकार्पण व पुजन केले यावरुन तालुक्यात खमंग चर्चा होत आहेत.
परवा राजमाता जिजाऊ नावाच्या ५ नवीन बसेसचे लोकार्पण केल्यानंतर आ.संजय बनसोडे यांनी बसस्थानकाच्या बांधकामाची पाहणी केली. तर माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राजमाता जिजाऊ बसेसचे पुजन केल्यानंतर बसस्थानकाच्या बांधकामाची पाहणी केली. सत्तापक्षातील वरील २ आजी,माजी आमदारांनी एकाच दिवशी माञ,एकञीत न येता वेगवेगळ्या वेळेत येत ७ वर्षांपासून रखडलेल्या उदगीरच्या बस स्थानकाच्या कामाची पाहणी केल्याने तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागात एकमेव असलेल्या हाळी येथील बसस्थानकातील बकाल अवस्थेकडे न बघता,आजवर दुर्लक्ष केल्याने हाळी व उदगीर तालुक्यात चर्चांना उधान आले आहे.
*खरोखरच आजी-माजी आमदारांमध्ये हिंम्मत असेल तर ते वरील प्रश्नांच्या मुळाशी जातील.
अन्यथा आजवर बसले तसे मुगगीळून बसतील*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या