Ticker

बार्शी शहर पोलिसांची कारवाई : कुडुवाडी रोड येथे कल्याण मटक्यावर छापा, एक जण अटक


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर– बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने कुडुवाडी रोड, गवात गल्ली येथील पत्राशेडच्या आडोशाला सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर छापा टाकून एका इसमाला अटक केली आहे. ही कारवाई १४ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.५० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना खात्रीशीर बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कुडुवाडी रोडवरील गवात गल्ली परिसरात पत्राशेडच्या आडोशाला एक इसम कल्याण मटक्याचा जुगार खेळत आहे. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रदीप झालटे आणि पथकाने पंचासह तत्काळ कारवाई केली.

कारवाई दरम्यान, पोलीसांनी ५५ वर्षीय सतीश गोविंद सावळे (रा. सोलापूर रोड, सावळे चाळ, बार्शी) याला जुगार खेळताना ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७५० रुपये रोख रक्कम, विविध अंक आकड्यांची नोंद असलेले पांढऱ्या रंगाचे कागद आणि निळ्या शाईचा बॉलपेन जप्त करण्यात आले. पंचासमक्ष हा जुगार साहित्य आणि रोख रक्कम जप्त करून त्यावर पोलिसांचे व पंचांचे सहीचे लेबल लावण्यात आले आहे.

याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२(अ) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, अशा अवैध जुगार प्रकरणांची माहिती मिळाल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या